सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, मराठी अभिनेत्याला अटक

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Jun 15 2021 2:40PM


ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली. कोटकर यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मयुरेश कोटकर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

काय आहे प्रकरण?

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

शिवसेना कार्यकर्त्यांची पोलिसात तक्रार

शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर कोटकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार