सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी--किरीट सोमय्या

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन ट्वीट्स केले आहेत. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, "महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.

Snehal Joshi .
  • Aug 21 2020 7:36PM
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  प्रकरणाचा तपास कुणी करायचा यावरुन चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने  या प्रकरणी आपला निकाल देत सीबीआयला  या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे राज्य सरकारसाठी  एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. सुशांत सिंह प्रकरणाच्या संबंधित सर्व कागदपत्रे, पुरावे हे सीबीआयकडे सोपवण्यासही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन ट्वीट्स केले आहेत. आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं, "महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलीस आयुक्तांनी २ महिने एफआयआर न घेणे दुर्देवी आहे. सुशांत सिंहच्या परिवाराला न्याय मिळेल" 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार