नागपूर: इथेनॉलनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना यापुढे कर्ज न देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. देशातील संभाव्य साखरसंकट टाळण्यासाठी ऊसाचा रस आणि साखरेच्या अर्कापासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर केंद्र सरकारने बंदी घातल्यामुळे साखर उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
या निर्णयाचा मोठा फटका कारखान्यांच्या खेळत्या भांडवलाला आणि पर्यायाने उसाला मिळणाऱ्या रास्त आणि किफायतशीर दरावर (एफआरपी) तसेच बँकांच्या कर्जावर होणार आहे.