सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तहसीलदार डापकर यांच्याकडील प्रभारी पद काढण्यात यावा:- सौ.व्याहळकर –

- सौ.व्याहळकर –

Sudarshan MH
  • Oct 23 2020 7:35PM
नांदेड दि.२३(अरविंद जाधव) हदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे हदगाव उपविभागाचा प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे. यांच्याकडे हे प्रभारी पद काढून घेण्यात यावे अशी मागणी प्रदेश महिला कॉंगे्रसच्या सरचिटणीस सौ.सुमिती व्याहळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हदगाव उपविभागीय कार्यालयाचा पदभार तहसीलदार जीवराज डापकर यांच्याकडे देण्यात आला आहे. देगलूर येथे तहसीलदार असतांना त्यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. अशा या अधिकाऱ्यावर एखाद्या उच्च पदाचा पदभार देणे म्हणजे प्रशासकीय सेवेला न शोभणारी कामगिरी आहे. त्यांच्या या विनयभंग प्रकरणी संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्याकडे असणारा उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात यावा तसेच अशा या कलंकित अधिकाऱ्यास त्यांच्या मुळ पदाशिवाय दुसरा कोणताही प्रभारी पदभार देण्यात येवू नये अशी मागणी प्रदेश महिला कॉंगे्रस कमिटीच्या सरचिटणीस सौ.सुमिती व्याहाळकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार