सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कार्यालयात थुंका, अन म्हणे दिष्टनसिंग पाळा... जेव्हा सभापती आगमन करत स्वतः थूंकतात कार्याल

जेव्हा सभापती आगमन करत स्वतः थूंकतात कार्याल

Sudarshan MH
  • Sep 23 2020 8:07PM
कार्यालयात थुंका, अन म्हणे दिष्टनसिंग पाळा...
जेव्हा सभापती आगमन करत स्वतः थूंकतात कार्यालयात..!!
.
(योगेश शर्मा)
बुलढाणा : कोरोना ने जीवन अवघड केले असून यामुळे लागलेल्या  लॉकडाउन मुळे जनजीवन गंभीर रूपाने प्रभावित झालेली आहे. कोरोना प्रभावितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना जिल्ह्यात पुन्हा लादलेला जनता कर्फ्यु जरी लोकहितासाठी असला तरी लोकांनाच त्याबद्दल गंभीरता दिसून येत नाही तर कर्जाच्या बोझ्याखाली असलेल्या व्यापाऱ्याला मात्र बैंका, फायनान्स, पतसंस्था कडून कोणत्याही प्रकारची मुभा नाही, शेवटी ते ही स्वतः बंधनात आहे, त्यांची परिस्थिती वेगळी नाही तर जागा भाड्याने घेऊन व्यवसाय करणारे व राहणारे यांना कोणत्याही प्रकारचा आधार जागा मालकाकडून मिळालेली नाही. तसेच बेरोजगारांसाठी सध्या हव्या तश्या नोकऱ्या सध्या उपलबध्द नाही. अश्यातच दिनांक २२ सप्टेंबर रोजी चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सचिव भरती ची जाहिरात आल्या नंतर झालेल्या प्रकाराने एपीएमसीचा गोंधळ तर समोर आला अन त्यांनी बेरोजगार तरुण तरुणींसमोर राजकीय द्वेष चा झेंडा हातात घेऊन या बेरोजगार तरुण पिढीची दिशाभूल करून एका प्रकारे हातात तुरी देण्याचा प्रकार झाला.. 
यावेळी सचिव च्या पदाकरिता मुलाखाती साठी आलेल्या युवकांना एपीएमसी चे सभापती येई पर्यंत वाट पाहण्यास भाग पाडले. खर तर तर राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या बेरोजगार तरुणांच्या जीवाशी खेळून त्यांना आर्थिक भुर्दंड तर सोसण्यास भाग पाडल्या गेले शेवटी साधे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पेलाभर पाण्याची कुठे साधी व्यवस्था सुद्धा नव्हती, असो, नेहमी प्रमाणे राजकीय गोटातून सभापती झालेले महोदय एपीएमसी मध्ये उशिरा दाखल झालेत, हे माहीत असतांनाही की, आज मुलाखाती साठी बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत आणि मुलाखाती आदल्या दिवशीच रद्द झाल्याची माहिती असताना सुद्धा ही, शेवटी राजकीय काळजीच म्हणावी याला..!
सभापतींचे वाहन कार्यालयाजवळ येताच उपस्थित तरुणांना एक आशेचे किरण दिसले, काही तरी मार्ग निघेन आणि उशिरा का होईना समाधान मिळेल.. भुकेल्या लेकराला अचानक आई दिसावी अन चिमुकल्याला संपूर्ण विश्व जणू भेटते आणि तो आई जवळ आहे त्या परिस्थितीत धावत सुटतो तसाचा काहीसा प्रत्यय समोर आले आणि हे दृश्य बघून मन सुन्न झाले..
तरुणांनी सभापतींच्या जवळ घोळका केला आणि चिव चिव करत आपली व्यथा मांडायला सुरवात केली. सभापती महोदयांनी हताश आहे हे दाखवले आणि आज मुलाखती रद्द झाल्या आहेत पुढे घेऊ तेव्हा कळवू गर्दी करू नका आधीच कोरोना आहे नियम पाळा असे सूचना वजा आदेश ही दिलेत..
नेमकं यावेळी माझ्या सोबत मुलाखती साठी आलेला एक तरुण माझ्या शेजारी उभा राहून घडत असलेला सर्व प्रकार पाहत होता, मला मस्करीत म्हणाला "सचिव पद सोडा, सभापती पद मिळेल का बघा" आणि हसला, थोडा प्रभावित झाला असेल तेव्हा.. तरुणांच्या गर्दीतून बाहेर येत सभापती महोदय कार्यालयात शिरत होते आणि घोळका मागे मागे जाण्यासाठी तयार होतात, आणि हे काय, कोरोनाची दाहकता सांगणारे सभापती महोदय सचिवांच्या कैबिन कडे जातांना कार्यालयातच थुंकले.. आणि शिट्ट काय माणूस आहे हा, जिथे सन्मान मिळतो तिथेच थुंकतो हे ऐकण्यास ही मिळते, यावेळी आलेली ही प्रतिक्रिया जागरूकतेचे प्रमाण होते, आपण ज्या ठिकाणी मुकाखात देण्यासाठी आलेलो आहे त्या ठिकाणाबद्दल आदरच होता.
बाहेर ज्यांनी सुशिक्षित तरुणांना कोरोनाबद्दल सांगितले ते स्वतः आपल्या दालनाच्या बाहेरच थुंकतात तर यांना काय म्हणावे, एरवी तोंडावर मास्क नसल्याने दंड भरावा लागत आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास, धूम्रपान करण्यास आणि विना मास्क घालून फिरण्यावर मज्जाव करण्यात आलेले आहे. जो नियम तोडतो त्यांच्यावर कारवाई सुद्धा होते, आणि ते शत प्रतिशत योग्य ही आहे.. परंतु एपीएमसी चे सभापती स्वतः जेव्हा आपल्याच कार्यालयात जिथे त्यांना सन्मान मिळाले तिथेच आपल्या दलनाबाहेर थुंकताना बऱ्याच जणांनी पाहिले आणि ते कैमरा मध्ये ही कैद झालेत.
यावेळी जो तरुण सभापती होण्यासाठी इच्छुक होता तोच पुन्हा मला म्हणाला, नको असले पद, ज्याला स्वतःच्या कार्यस्थळाची इज्जत न करण्याचे सुदधा अवगत होत नाही, हे इथे सर्रास थुंकत आहेत तर या इथल्या कामात या लोकांची किती ढवळाढवळी असेल हे कळते, मला नको इथे काम..!
हे ऐकल्यावर मला सुद्धा बातमी वजा लेख लिहीण्याचा मोह आवरता आले नाही. शेवटी कर्तव्य सुद्धा आहेच..
हा प्रकार झाल्यानंतर आता प्रशासन नेमकं काय भूमिका घेतो या सभापती महोदयांबद्दल हे बघण्यासारखे असेल, आणि काही भूमिका घेतलीच तर ती सार्वजनिक ही करावी जेणेकरून नियम सर्वांसाठी सारखेच कळेल लोकांना.. 
त्या कार्यालयातील प्युन तरुणांना गोळा होऊ नका, दिष्टन्सिंग पाळा, थांबू नका असे उपदेश देत असतांना सभापती ना थुंकताना टोकले सुद्धा नाही, वरिष्ठ ही असतीलच तेव्हा सोबत, मंग यांच्यावर ही काही कारवाई होईल की, 'जाऊद्या न भो सोडा न' म्हणत वेळ मारल्या जाईल..?

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार