सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालघर जिल्हयामध्ये भूकंपाविषयी जाहीर आवाहन

भूकंपाविषयी जाहीर आवाहन

Sudarshan MH
  • Sep 13 2020 6:56PM
पालघर - ( मनीष गुप्ता )  पालघर जिल्हयामध्ये डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये सतत होणारे भूकंपामुळे खालीलप्रमाणे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तरी नागरीकांनी काही आपत्ती झाल्यास अगर आपत्ती विषयक काही सूचना दयावयाचे झाल्यास खालील नमूद मोबाईल क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.

तहसिल कार्यालय डहाणू नियंत्रण कक्ष मोबाईल क्र. ९६०७७४४२५८
तहसील कार्यालय तलासरी नियंत्रण कक्ष मोबाईल क्र. ९६३७६९२१२७

     सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पालघर जिल्हयातील डहाणू व तलासरी तालुक्यामध्ये काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या भूकंपाच्या धक्यामुळे घाबरून जाडु नये. प्रशासनाच्या वतीने प्रसारित होणाऱ्या सूचनांचे पालन करुन या आपत्तीवर मात करु शकतो. भूकंप झाल्यास मोकळया मैदानात त्वरीत जावे. घरातील लाईट व गॅस अथवा चूल बंद करावे. बाहेर जाणे शक्य नसल्यास टेबलच्याखाली आश्रय घ्यावा. लाईटच्या वायरांना हात लावू नये, प्रशासनातर्फे भूकंप विषयक आपत्तीचा सामना करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
१. प्रत्येक गावामध्ये ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. 
२. नागरी संरक्षण दल (CDS) यांच्या द्वारे प्रत्येक गावामध्ये भूकंप आपत्ती शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहेत.विषयी जनजागृती
३. भूकंप प्रवण गावामधील लोकांसाठी मोकळया मैदानामध्ये ठिकठिकाणी पक्के तंबू (Tents) उभारण्यात आले आहेत.
४. भूकंप आपत्ती झाल्यास कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी मॉक ड्रील (Mock Drills) चे आयोजन करण्यात येणार आहे.
५. भूकंप आपत्तीमध्ये काय करावे आणि काय करु नये याविषयी दृकश्राव्य (Audio & Vides)माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
ठिकाण- डहाणू दि.१९/०९/२०२० असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू आशिमा मित्तल यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार