सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना IT Cell कडून कंगना रनौत विरोधात पोलिस तक्रार दाखल; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेना IT Cell कडून कंगना रनौत विरोधात ठाणे शहरात पोलिस तक्रार दाखल; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sudarshan MH
  • Sep 8 2020 10:09AM
शिवसेना IT Cell कडून कंगना रनौत विरोधात ठाणे शहरात पोलिस तक्रार दाखल; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 अभिनेत्री कंगना रनौतआणि शिवसेना   यांच्यामध्ये  रोजच वाणी चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहराची तुलना POK  सोबत केल्यानंतर ट्वीटरवर शिवसेना कार्यकर्ते आणि कंगनामध्ये सोशल मीडिया युद्ध चांगला रंगला आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेना आय टी सेल कडून ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कंगना च्या मुंबईला POK सोबत तुलना करण्यावरून देशद्रोहाचा आरोप लावत FIR दाखल करण्याबाबत सांगितले आहे.


कंगना रनौतने मुंबईची पाक व्याप्त कश्मीर सोबत तुलना करत मुंबई मध्ये मला पोलिसांची बॉलिवूड माफियांपेक्षा भीती वाटते. शिवसेना खासदारां संजय राऊत यांनी मला मुंबई मध्ये परतू नकोस अशी खुली धमकी दिली आहे. अशाप्रकारची ट्वीट्स केली होती. त्यानंतर भडकलेल्या शिवसैनिकांनी देखील कंगनाची पोस्टर्स फाडत तिच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कंगनाने माफी मागावी अन्यथा मुंबईत आल्यानंतर तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार