सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वसई विरार शहर महानगरपालिकेमधील वर्ग – ३ ची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच एजन्सी नेमणार

वसई विरार शहर महानगरपालिकेमधील

Sudarshan MH
  • Aug 27 2020 12:29PM
विरार - (मनीष गुप्ता) सन २००९ मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली. स्थापनेनंतर ४ नगरपरिषदा व संबधीत ग्रामपंचायतीमधील कर्मचारी महानगरपालिकेत वर्ग करण्यात आले परंतु सदरचा कर्मचारीवर्ग अपुरा पडत असल्यामुळे सध्या ठेका पद्धतीने कर्मचारी नेमून त्याद्वारे कामकाज केले जात आहे. महानगरपालिकेच्या आकृतीबंधानुसार वर्ग ३ ची विविध संवर्गातील पदे महानगरपालिकेत रिक्त आहेत व ती पदे लवकरात लवकर भरणे अपेक्षित आहे. यासाठी महानगरपालिकेकडून वेळोवेळी प्रयत्न चालू होते. त्याच अनुषंगाने महानगरपालिकेमार्फत वर्ग – ३ च्या पदांची संगणक प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया करणेकामी अनुभवी सक्षम यंत्रणा/अभिकर्त्याची (एजन्सीची) नेमणूक करण्यात येणार आहे. सक्षम यंत्रणा/अभिकर्ता(एजन्सी) नेमणे कामी महानगरपालिकेतर्फे ई-निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून एजन्सी नेमल्यानंतर सदर भरती प्रक्रिया पूर्ण करणेत येईल. नवीन भरती केल्याने महानगरपालिकेस स्वत:चा जबाबदार कर्मचारी वर्ग उपलब्ध होईल व त्यांचेवर जबाबदारी निश्चित होऊन महानगरपालिकेच्या कामाच्या दर्जात सुधारणा होईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार