सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*महाराष्ट्रात ते दुकानदार चीनमध्ये तयार झालेले क्रीडा साहित्य विक्रीस ठेवणार नाही.*

क्रीडा साहित्यातही चीनमधील कंपन्यांची मक्तेदारी वाढत आहे. चीनमध्ये तयार झालेले क्रीडा साहित्य आम्ही विक्रीस ठेवणार नाही. असे महाराष्ट्रातील क्रीडा साहित्य विक्रेत्यांनी ठरवले आहे. याकडे मनोहर वागळे यांनी लक्ष वेधले आहे.

Snehal Joshi .
  • Jun 21 2020 11:40PM
कोरोना ची सुरुवात चीन मध्ये झाली आणि कोरोना चा जगात वाढणारा प्रभाव, त्यात चीन विरुद्ध सीमेवर संघर्ष सुरू झाल्यामुळे चीन विरोध तीव्र होत आहे. त्यात चीनी कंपन्यांना विरोध करण्याची मागणी जास्तच जोर धरत आहे. क्रीडा साहित्यातही चीनमधील कंपन्यांची मक्तेदारी वाढत आहे. चीनमध्ये तयार झालेले क्रीडा साहित्य आम्ही विक्रीस ठेवणार नाही. असे महाराष्ट्रातील क्रीडा साहित्य विक्रेत्यांनी ठरवले आहे. याकडे मनोहर वागळे यांनी लक्ष वेधले आहे. मनोहर वागळे हे वागळे अँड कंपनी ही हिंदुस्थानातले पहिले क्रीडा साहित्य दुकानाचे मालक आहेत. तसेच ते मुंबई क्रीडा साहित्य विक्री संघटनेचे अध्यक्ष आहेत. क्रीडा साहित्यत अनेक कंपन्या परदेशी आहेत. सर्वच कंपन्या चीनी आहेत असे नाही.पण त्यातील अनेक कंपन्या क्रीडा साहित्याची निर्मिती चीनमधून करून घेत आहेत. याकडे वागळे यांनी लक्ष वेधले. आम्ही चीनमध्ये बनवलेल्या कोणताही माल ठेवणार नाही असे महाराष्ट्रातील क्रीडा साहित्य विक्री दुकानदारांनी ठरवले आहे. सोबतच चीनमध्ये बनलेला माल नको. तो बंद करा आम्ही घेणार नाही. असे भारतातील कंपन्यांना कळवले आहे असे वागळे यांनी सांगितले. वागळे अध्यक्ष असलेल्या संघटनेत 180 पेक्षा जास्त दुकानदार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार