सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

व्यवहारातून अपहरण झालेल्याला व्यक्तीची ; पोलिसांकडून सहा तासात सुटका

मराठवाडयातील तीस-तीस घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारातून एका 40 वर्षीय व्यक्तीचे झाले होते अपहरण

Abhimanyu
  • Aug 5 2022 8:26PM
संभाजी नगर :- राज्यभरात गाजलेल्या मराठवाडयातील तीस-तीस घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारातून एका 40 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ पथक रवाना करत अवघ्या सहा तासात या व्यक्तीची सुटका केली आहे. याप्रकरणी पैठण पोलिसांनी तिघांना अटक केली असून, दोन जण फरार झाले आहेत. मात्र या घटनेने पुन्हा एकदा तीस-तीस घोटाळ्याची चर्चा समोर आली आहे.
     कविता दिलीप चव्हाण (वय 35 वर्षे रा. बोकुड जळगाव तांडा ता. पैठण जि. संभाजी नगर) यांनी पैठण पोलिसात बुधवारी आपल्या पतीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. गुन्हयाचे गांभीर्य ओळखून संभाजी नगर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल आणि पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी तात्काळ पथक आरोपींच्या शोधात रवाना केले. दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रीक आधारावर गुन्हयातील अपहरणकर्ते यांचा पथकाने पत्ता शोधून काढला. त्यामुळे अवघ्या सहा तासामध्ये आरोपींचा छडा लावून दिलीप चव्हाण यांची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.
    मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, दिनेश प्रमोद राठोड, ( तीन्ही राहणार बोकुडजळगाव तांडा ता. पैठण जि. संभाजी नगर ) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर याच गुन्हयात कृष्णा कल्याण तरमळे, पांडूरंग सदाशिव नागे (दोन्ही राहणार बोकुड जळगाव ता. पैठण) हे फरार आहेत. तर हे अहपहरण तीस-तीस आर्थीक घोटयाळयातील पैशाच्या व्यवहारावरून झाले आहे. हा व्यवहार 25 लाखाचा असल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार