सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये जखमींना एक लाख रुपयांची मदत

पालघर - विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे.

Sudarshan MH
  • Apr 23 2021 11:28AM


घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल - पालकमंत्री दादाजी भुसे

पालघर - विरार येथील  विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला  आहे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले           
  विरार येथील विजय  वल्लभ आयसीयू कक्षाला रात्री 3:30  च्या सुमारास आग लागली पालकमंत्री श्री भुसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
  ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार