सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार: लॉकडाऊन विरोधात डफली बजाव आंदोलन

लॉकडाऊन

Nandurbar MH
  • Aug 13 2020 11:21AM
  सुदर्शन न्युज : नंदुरबार एस.टी.बससेवा व इतर वाहतुक व्यवस्था सुरळीत करावी, लॉकडाऊन थांबवावे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नंदुरबार जिल्ह्यात डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
 केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक जिल्हाधिकारी प्रशासन हे वेळोवेळी लॉकडाऊन करीत आहेत. या लॉकडाऊनचा फटका असंघटीत शेतमजुर, कामगार, ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना बसत आहे. तसेच शेतकरी, व्यापारी, लॉरीवाले, मध्यमवर्गीय यांना रोजगार नसल्याने या सर्वांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व वर्गाच्या प्रत्येक कुटूंबियांना रुपये १० हजार प्रत्येकाच्या खात्यात जमा करावे. नंदुरबार जिल्ह्यातील खासदार, आमदार, पालकमंत्री व समाजातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील लोकांना विश्वासात घेवुन प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करणे आवश्यक आहे. परंतु केवळ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या सल्ल्याने हे लॉकडाऊन वारंवार होत असते. याचाही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निषेध करण्यात येत आहे; असे निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात व निवेदन देताना अरुण रामराजे, पुष्पाताई वानखेडकर, नानासाहेब ठाकरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मा.प्रदेश सचिव आघाडी उद्धव पिंपळे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कुवर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील जिल्हा उपाध्यक्ष जालमसिंग वळवी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणभाऊ भिल आदींनी सहभाग घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार