सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ग्राहकांमध्ये जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबवावी -जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार दि.1: आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत त्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात.

Nandurbar MH
  • Oct 2 2021 5:59PM


नंदुरबार दि.1: आगामी काळातील विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना शुध्द व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी सर्वांनी सातत्याने प्रयत्न करावेत त्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न्ान सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठक पार पडली. बैठकीस अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे (अन्न), पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीस्कर,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ.निखिल गोंडे, जिल्हा अन्न व्यवसायीकांचे प्रतिनिधी संतोष जैन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सव काळात भेसळयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत अन्नपदार्थामधील भेसळ कशी ओळखावी यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करावी. अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत प्रत्येक अन्न व्यावसायिकाने अन्न पदार्थ उत्पादन, साठवण, वितरण, वाहतूक व विक्रीसाठी अन्न व परवाना तथा नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकांने नोंदणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्यात.

सहाय्यक आयुक्त श्री. कांबळे यांनी सांगितले, गेल्या वर्षी  नंदुरबार जिल्ह्यात 17 हजार  रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्यात येवून या मोहिमेच्या माध्यमातून अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.यावेळी समितीच्या सदस्याचे कार्य विषद केले. 
बैठकीस विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार