सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार दि.23 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत सादर करावयाचे आहेत.

Nandurbar MH
  • Aug 24 2021 11:43AM


नंदुरबार दि.23 :  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत सादर करावयाचे आहेत. 

 जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती, विजाभज या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवंत्ताधारक शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात कामकरणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, नववी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीचे मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (एन.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ) तसेच इतर शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते. 

मुख्याध्यापकांनी यासंबंधित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333


सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार