सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेमडेसिवरचे श्रेय लाटणाऱ्यांची शासकीय माहितीने केली पोलखोल

नंदुरबार : जिल्ह्यात रेमडिसीव्हर या ईन्जेक्शनचा तुटवडा भासत असतांनाच राजकीय नेत्यांनी अचानक ते ऊपलब्ध करून

Nandurbar. MH
  • Apr 8 2021 8:53AM
केतन रघुवंशी. नंदुरबार
नंदुरबार : जिल्ह्यात रेमडिसीव्हर या ईन्जेक्शनचा तुटवडा भासत असतांनाच राजकीय नेत्यांनी अचानक ते ऊपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरु केली आहे. तथापि पालक मंत्र्यांच्या आदेशाने मिळालेल्या ईंजेक्शनचे श्रेय लाटण्याचा व रुग्णांच्या संकटात आपली प्रसिध्दी लाटून घेण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला आहे.
     कोरोना संकट वाढतच असून दहा दिवसांपासून रोज 12, 14, 17 मृत्यू होत आहेत. कोरोना रुग्णांना दिलासा देणाऱ्या रेमडिसीव्हर ईन्जेक्शनचा मात्र तुटवडा भासत असून जीवघेणा कोंडमारा रुग्ण अनुभवत आहेत. नंदुरबार वासियांची त्यासाठी मोठी धावपळ सुरु आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी पालक मंत्री के.सी.पाडवी यांच्या आदेशाचे पालन करीत तत्परतेने ऊधार तत्वावर नंदुरबारच्या सेंटरला 1000 इंजेक्शन उपलब्ध करून दिले. मात्र काही महाभाग त्याचे श्रेय लाटून घेत नंदुरबार वासियांवर महा ऊपकार केल्याचे भासवू लागले आहेत. अनेक चमचे तसल्या पोस्ट व्हायरलही करू लागले आहेत. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवण्याची ही प्रवृत्ती सध्या टीकेचे लक्ष्य बनली आहे. कारण जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत माहितीनेच यांची पोलखोल केली आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये ही उपलब्धता करून दिली आहे. ती सविस्तर शासकीय माहिती अशी-बाजारात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने आणि त्या पार्श्वभूमीवर जनतेची गैरसोय दूर होणे गरजेचे असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे रोटरी वेलनेस सेंटरला शासकीय अथवा त्यापेक्षा कमी दराने वितरीत करण्यासाठी उसनवारी तत्वावर 1000 रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन आवश्यक असल्याने मंगळवारी झालेल्या कोविड आढावा बैठकीत खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले होते. शासकीय रुग्णालयांसाठी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने त्यानुसार पुढील व्यवस्था होईपर्यंत खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ा्ब् करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या.
सदर इंजेक्शन कोविड-19 रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आलेल्या रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. रेमडिसीवीर सी व डी वर्गातील रुग्णांना डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार (प्रिस्क्रीप्शन) देण्यात येणार आहे. इंजेक्शन दिलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा रुग्णालयात तातडीने जमा करावयाची आहे. इंजेक्शनचे वितरण मुळ शासकी किंमतीनुसार किंवा कमी किंमतीने करण्यात येणार आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचा जीव वाचविण्याच्यादृष्टीने हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. 
 दरम्यान आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री एडवोकेट के सी पाडवी यांनी 10 हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य विभागाकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उपचारासाठी डॉक्टर्स आणि रुग्णांकडून रेमडिसीव्हरची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. या औषधाचा शासकीय व खाजगी रुग्णालयांना आवश्यकतेनुसार पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्याला 10 हजार रेमडिसीव्हर इंजेक्शन देण्यात यावेत, असे पाडवी यांनी पत्रात नमूद केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार