सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गांजाची वाहतूक करणारे दोन्ही स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ४ लाख २७ हजार रुपये किमंतीच्या गांजासह एकूण ९ लाख २७ हजार रुपये किमंतीच्या मुद्देमाल जप्त

नंदुरबारचे पोलीस निरीक्षक श्री .विजयसिंग राजपुत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली

Nandurbar MH
  • Dec 23 2020 6:42PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार :-दि २२/१२/२०२० रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ,नंदुरबार चे पोलीस  निरीक्षक श्री .विजयसिंग राजपुत यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की २२/१२/२०२० रोजीच्या रात्री धडगांव येथुन शहादा कडे महिंद्रा मॅक्स चारचाकी वाहनाने अमली पदार्थ सुका गांजाची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नंदुरबार चे पोलीस निरीक्षक  श्री विजयसिंग राजपूत  यांनी शहादा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंध्यावर कारवाई कमी गेलेल्या पथकास सदर बातमी सांगून योग्य ते सविस्तर मार्गदर्शन करुन कारवाई करणे कमी आदेशीत केले  मिळलेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे मा.पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्रीविजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विजयसिंग राजपुत व पथकाने दिनांक 22/12/2020 रोजी शहादा तालुक्यातील दरा फटयावर वाहन उभे करुन धडगांवकडून येणाऱ्या वाहनांचे निरिक्षक करीत थांबलेले असतांना रात्री 08.30 वाजेच्या सुमारास धडगांव गावाकडुन एक महिंद्रा चारचाकी गाडी वेगाने येतांना दिसुन आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी हाताने व बॅटरीच्या सहायाने वाहने उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला, म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन वाहनामध्ये असलेल्या दोन्ही इसमांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव (1) पोप्या डेमच्या पावरा वय - 25 रा.धडगाव पिंप्री ता.धडगांव (2) विनोद भगवान चव्हाण वय - 21 रा. वडफळया ता धडगांव असे सांगितले. त्यांना कोठुन आले व कोठे चालले, गाडीमध्ये काय माल भरला आहे याची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देवुनखोटे बोलते असल्याचे निदर्शनास आले, परंतु त्यांना पोलीसी खाक्या दाखवुन वाहनांची तपासणी केली असता त्यात प्लास्टीकचे गोण्या दिसल्याने त्यांना उघडुन पाहिले असता त्यात अमंलीपदार्थ सुका गांजा मिळुन आला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार