सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहादा येथे मजुरांच्या आयसर गाडीला ट्रॅव्हल्स बसची धडक

भिषण अपघातात ५ जागीच ठार तर १७ मजुर गंभीर जखमी

Sudarshan MH
  • Sep 30 2022 10:58AM


भिषण अपघातात ५ जागीच ठार तर १७ मजुर गंभीर जखमी

शहादा- शहरातील नवीन बसस्थानक जवळील वळणावर दि.२८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मजुरांना घेऊन जाणाऱ्या आयसरगाडीला खाजगी ट्रॅव्हल्स बसने समोरुन जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले तर १७ मजुर गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये ४ मजुर व १ बसचालक याचा समावेश आहे.मयत हे शहादा तालुक्यातील पाडळदा व अलखेड येथील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,  शहादा तालुक्यातील पाडळदा व अलखेड येथील मजुर पंढरपूर येथे ऊसतोडणीच्या कामासाठी आपल्या कुटुंबासह शहादा येथुन आयसर गाडीने  दि.२८ सप्टेंबर रोजी बुधवारी दुपारी ४ वाजता जात असताना शहरातील नवीन बसस्थानक जवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव खाजगी ट्रॅव्हल्स बसने आयसरला जोराची धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की आसयर गाडी काही फुटांपर्यंत दूर फेकली गेली. या भिषण अपघातात गंभीर दुखापती झाल्याने प्रमिला किशोर भिल (२८), सुनिता अशोक पाडवी (४५), करण अशोक पाडवी (२६ तिघे रा.पाडळदा) व रमणभाई अखिराम बिल (५०,रा.अलखेड) हे चार जागीच ठार झाले तर बसचालक रहिमभाई गोगानी (४५,रा.जुनागड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या अपघातात १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत केली. अम्बुलन्स द्वारे शहादा रुग्णालयात जखमीवर उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता.मजुरांचे साहित्य ही विखुरलेले होते. सदर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे,शहादा पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे, जितेंद्र पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना मदत केली.तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.आ. राजेश पाडवी यांनी जखमीची नंदुरबार जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. मकरंद पाटील, विनोद जैन, पंकज सोनार,हेमलता शीतोळे,मोहन शेवाळे, सुरेंद्र कुवर,आ.राजेश पाडवी यांचे स्वीय सहायक हेमराज पवार आदींनी जखमींना सहकार्य केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार