आरडाओरड केल्याचा जाब विचारल्याने शहादा येथे एकाला लोखंडी सळईने मारहाण
शहादा येथे एकाला लोखंडी सळईने मारहाण
शहादा - आरडाओरड व शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकाला दोघांनी लोखंडी सळई व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील भवानी चौकात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भवानी चौकात दिपक भरत कोळी व शरद काशिनाथ कोळी हे दोघे जोरजोरात आरडाओरड व शिवीगाळ करीत होते. दरम्यान प्रशांत शिवाजी कोळी यांनी त्यांना आरडाओरड का करीत आहेत अशी विचारणा केली असता त्याचा रागातून दोघांनी प्रशांत कोळी यांना लोखंडी सळई व हाताबुक्क्यांनी मारहाण केली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प