सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार शहरात छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी-स्वक्ताने लिहून दिले निवेदन*

छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी-स्वक्ताने लिहून दिले निवेदन*

Nandurbar. MH
  • May 19 2022 3:46PM

  नंदुरबार: नंदुरबार नगरपालिकेने शहरात अनेक राष्ट्र पुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले आहेत. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणांची बलिदान देऊन देव, देश, धर्म जीवंत ठेवला अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नंदुरबार शहरात व्हावा अशी सर्व शिवशंभू प्रेमींची इच्छा आहे. तरी हा  पुतळा शहरातील मध्यवर्ती ठिकाण नवीन नगर पालिका / नाट्य मंदिर आणि स्व. श्री भटेसिंहभैय्या रघुवंशी उद्यान यामधील रिकामी जागा , श्रीस्वामी समर्थ  केंद्र शेजारील जुने उद्यान  याठिकाणी उभारावा या आशयाचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समिती आणि शिवशंभू भक्तांनी पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले.
  छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी स्वतःरक्ताने निवेदन लिहून शिवशंभू भक्तांचा उपस्थितीत मुख्याधिकारी यांना दिले. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी धर्मनिष्ठा आणि स्वराजनिष्ठा सोडली नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे  जीवन चरित्र संपूर्ण विश्वासाठी आदर्श आहे. शहरातील नागरिकांना छ. संभाजीराजे आदर्श जीवनचरित्रातुन  आदर्श नागरिक घडावे यासाठी नंदुरबार शहरात छ. संभाजीराजे यांचे पुतळा होणे आवश्यक आहे. पुतळ्याचा अवतीभोवती छ. संभाजीराजे यांचा जीवन चरित्रविषयी शिल्प निर्माण करावे व स्मारकाचा अग्रस्थानी छ संभाजीराजे यांची राजमुद्रा लावावी तसेच छ. संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेत ठराव करून निधीची तरतुद करून स्मारक उभारावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर हिंसेससचे नरेंद्र पाटील, हभप रामकृष्ण महाराज, मराठा क्रांती मोर्चाचे नितीन जगताप, क्षत्रिय मराठा पंच मंडळाचे हरीश हराळे, आर एस एस चे हर्षद पत्की, विक्रम रघुवंशी, प्रमोद मराठे, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, विशाल सावळे माळी, गणेश राजपूत, मयूर चौधरी, पंकज डाबी आदी शिवशंभू भक्त उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार