सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रतिमा मलीन केल्याने नंदुरबारात केतकी चितळे व अँड.भावे यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल

नंदुरबारात केतकी चितळे व अँड.भावे यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल

Nandurbar MH
  • May 16 2022 5:27PM
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रतिमा मलीन केल्याने नंदुरबारात केतकी चितळे व अँड.भावे यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल            
नंदुरबार- सोशल मीडियावर खोटी पोस्ट टाकून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सामाजिक प्रतिमा मलीन केल्याने नंदुरबारात केतकी चितळे व अँड.भावे यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार शहर अध्यक्ष नितीन जगताप यांनी दि.१३ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर फिर्यादीनुसार केतकी चितळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विषयी सामाजिक प्रतिमा मलीन करणारी पोस्ट टाकून त्यांचा घोर अपमान केला आहे. तर सामाजिक प्रतिमा मलीन करणारे खोटे विधान अँड. भावे यांनी केले आहे.सदर विधानाला केतकी चितळे यांनी समर्थन करत शरद पवार यांच्या अब्रुला नुकसान होईल, हे माहीत असूनही सोशल मीडियावर पोस्ट टाकून अब्रुनुकसानीचा गुन्हा केला.याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात  भादंवि कलम ५०१,५०२,५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलिस उप निरीक्षक माधुरी कखंरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार