सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विश्व हिंदू परिषद तसेच विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा नागपुरात सुरू

नागपुर. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विश्व हिंदू परिषद तसेच विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा नागपुरात सुरू करण्यात आली आहे.

Senhal Joshi MH
  • May 11 2021 10:29AM


बॉक्स....
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विश्व हिंदू परिषद तसेच विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा नागपुरात सुरू करण्यात आली आहे. सोमवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्यालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सेवा प्रारंभ करण्यात आली.


नागपुर.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता विश्व हिंदू परिषद तसेच विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सुविधा नागपुरात सुरू करण्यात आली आहे. सोमवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांत कार्यालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सेवा प्रारंभ करण्यात आली
या प्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात विहिंपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्सचे पूजन करण्यात आले. नागपुरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची कमतरता बघता विहिंपतर्फे दिल्लीहून 10 मशीन मागवण्यात आल्या आहेत. गरजू रुग्णांकरिता नाममात्र शुल्कात नागपुरातील 6 भागात कार्यकर्त्यांच्या चमूमार्फत त्या मशिन्स उपलब्ध राहतील.
 
 
या सेवाकार्याचे महानगर सेवाप्रमुख पुरुषोत्तम रंगलानी तर सह सेवाप्रमुख म्हणून मनोज पाटील राहतील. अमित बेंबी, विशाल पुंज यांच्या नेतृत्वात सेवाकार्य चालणार असून, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत देण्यात आले आहे. विहिंपतर्फे नागपुरात मोठ्या प्रमाणात सेवाकार्य चालू असून, त्या अंतर्गत सॅनिटायझेशन, गरजू कुटुंबांकरिता धान्य किट तसेच जेष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेण्या-आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
 
 याप्रसंगी विहिंप विदर्भ प्रांत मंत्री गोविंद शेंडे, प्रांत सहमंत्री सनतकुमार गुप्ता, विहिंप नागपूर महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, हिंदू जनकल्याण परिषदेचे रविकिरण चर्जन, विहिंप नागपूर महानगर उपाध्यक्ष डॉ. करण माने, अमित बेंबी, निरंजन रिसालदार, पुरुषोत्तम रंगलानी, विशाल पुंज, मनोज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार