सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार:आयान कारखान्याने दिला उसाला दहा वर्षातील सर्वोच्च दर

नंदुरबार : तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर

NANDURBAR MH
  • Feb 9 2021 4:12PM
 
नंदुरबार : तालुक्यातील समशेरपुर येथील आयान साखर कारखान्याने उसाला प्रतिटन २४२५ रुपये दर दिला आहे. हा दर गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक एस.एस.सिनगारे यांनी दिली.
कारखान्याच्या ऊस गाळपास संदर्भात माहिती देताना श्री.सिनगारे म्हणाले, आयान साखर कारखान्याने ऊसदराची उच्चांकी परंपरा कायम राखली आहे. या वर्षी उसाला एकरकमी २४२५ रुपये प्रति मेट्रिक टन दर घोषित करण्यात आला आहे. दहा वर्षांची तुलना करता हा सर्वाधिक दर आहे. ऊस उत्पादक जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. कारखान्याची अत्याधुनिक गाळप क्षमता विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कारखाना दररोज सात हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत आहे. कारखान्याने वीज निर्मिती प्रकल्प उभारला आहे. कारखान्यात दररोज वीज निर्मिती होत आहे. ही वीज महावितरणला दिली जात आहे. त्याचाही कारखान्याच्या उत्पादन क्षमतेला लाभ होणार आहे.
गाळप क्षमता वाढीसाठी नियोजन केलेले असताना कोविड-१९ सारखे महाभयंकर संकट ओढवले. या संकटावर मात करत कारखाना पूर्ण क्षमतेने नव्हे तर अधिक क्षमतेने सुरू करण्यास यश आले. कारखान्याकडे नोंद आणि बिगर नोंद संपूर्ण ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. हा सर्व ऊस गाळप होईपर्यंत कारखाना सुरू राहील. उपलब्ध संपूर्ण उसाचे गाळप वेळेवर करून घेण्यात येईल. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करून गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती श्री.सिनगारे यांनी यावेळी दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार