सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

किल्लय़ांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील गड-किल्लय़ांचे पावित्र्य जपून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

Sudarshan MH
  • Jun 14 2021 12:59PM


मुंबई : राज्यातील गड-किल्लय़ांचे पावित्र्य जपून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  दिली.

राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्गसंवर्धक, गिर्यारोहक यांनी या संदर्भातील सूचना आणि प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींनी आपले विचार सर्वाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले. गडकिल्लय़ांचे पावित्र्य जपत, त्यांच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड, राजगड या किल्लय़ांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वाच्या सूचना आणि विचाराने आराखडा तयार करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गड-किल्लय़ांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा प्रथम सविस्तर विचार करा. उत्तमोत्तम छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून काढलेल्या ध्वनीचित्रफिती या माध्यमांतून जगभरात शिवरायांच्या गड-किल्लय़ांची महती जगभर पोहोचवली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गड-किल्यांच्या पायथ्याशी त्यांची संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारण्यात यावे, केंद्र आणि राज्याकडील किल्लय़ांच्या वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी-पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्त्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार