सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदर पुनावाला यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.4 - सिरम इन्स्टिट्यूट चे प्रमुख आदर पुनावाला यांना धमक्या दिल्याची माहिती पुढे आली आहे.

Sudarshan MH
  • May 4 2021 8:13PM


मुंबई दि.4 - सिरम इन्स्टिट्यूट चे प्रमुख आदर पुनावाला यांना धमक्या दिल्याची माहिती पुढे आली आहे.कोरोना च्या कठीण काळात संपूर्ण जगात सिरम इन्स्टिट्यूट तर्फे बनविण्यात आलेली कॉविशिल्ड लस ही जीवदान देणारी लस ठरली आहे.त्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.अशी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या आदर पुनावाला यांना कोणी धमक्या देत असल्याची अत्यंत निषेधार्ह बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र सरकार ने सखोल चौकशी करून आदर पुनावाला यांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

 सिरम इन्स्टिट्यूट तर्फे पुण्यात जलद गतीने कोवीशिल्ड लसीची निर्मिती केली जात आहे.पुढील 2 महिन्यात लसीचे 11 कोटी डोस देण्याची ऑर्डर भारत सरकार तर्फे सिरम इन्स्टिट्यूट ला दिली आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्याने लसीचे डोस पुरविले जातील. एका रात्रीत सर्व डोस कुणालाही निर्माण करता येणार नाही असा खुलसा आदर पुनावाला यांनी केला आहे. लस बनविण्यात सिरम इन्स्टिट्यूट वेगवान कार्यरत आहे या पार्श्वभूमीवर  आदर पुनावाला यांना धमक्या मिळणे अत्यंत चूकीचे निषेधार्ह आहे.राज्य सरकार ने याबाबत चौकशी करून धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान 
पश्चिम बंगाल मध्ये मोठा विजय ममता बॅनर्जी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या तृणमूल काँग्रेस चे कार्यकर्ते हिंसाचार करीत आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला जात आहे.भाजप च्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहे.हे लोकशाही विरोधी आहे. ममता बॅनर्जीं यांच्या प्रतिमेवर कलंक लावणारा तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिंसाचार  त्यांनी त्वरित थांबविला पाहिजे. लोकशाहीत जनतेने मतदानातून आपला कौल ममता बॅनर्जीं यांना लाभला आहे. त्यांनी सत्ता हाती घेत राज्याचा विकास करण्यसाठी प्रयत्न करावेत त्यासाठी आधी आपल्या कार्यकर्त्यांना हिंसाचार करण्यापासून रोखावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
पाश्चिम बंगाल च्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या आघाडी ला संपूर्ण नाकारत जनतेने मतदान तृणमूल काँग्रेस च्या पारड्यात टाकले.डावी आघाडी ला मतदान मिळाले असते तर मतविभागणीचा लाभ मिळत भाजप चे किमान 170 उमेदवार निवडून आले असते . निवडणुकीत अनेक लोक तृणमूल काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश करीत होते.भाजप च्या सभांना गर्दी मोठी होती.जनतेचा भाजप ला प्रचंड प्रतिसाद होता त्यामुळे  पश्चिम बंगाल मध्ये सत्तांतर होऊन भाजप सत्तेत येईल असा अंदाज होता मात्र ममता बॅनर्जी यांचा वीजय झाला आहे. त्यांनी आता कार्यकर्त्याना हिंसाचारापासून रोखावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार