सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई महानगर डेअरीच्या कामगारांनी केली बेमुदत उपोषणाची घोषणा

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई महानगर डेअरीच्या कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आता तेथील कामगारांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे.

Shruti Patil
  • Dec 11 2023 5:48PM

मुंबई: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई महानगर डेअरीच्या कामगारांच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्याने आता तेथील कामगारांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. त्यात प्रिया भारत मिटके हे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

सर्व कामगारांनी या उपोषणाचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्व कामे थांबवणार नाही, त्यापैकी निम्मे दैनंदिन काम पूर्ण करतील आणि निम्मे कर्मचारी या संपात सहभागी होतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या...
- दूध महासंघ चालविण्यास असमर्थ ठरलेले संचालक मंडळ बरखास्त करून दूध महासंघाचा कारभार प्रशासक नेमून पुर्णपणे शासनाच्या नियंत्रणाखाली चालवावा किंवा दूध महासंघ पुर्णपणे राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड (एनडीडीबी) यांच्याकडे चालविण्यास द्यावा.
 
- दूध महासंघातील कामगार कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांचे थकीत वेतन, फरकासह दोन वार्षिक वेतनवाढ, शासनाने जाहीर केलेले महागाई भत्ते फरकासह लवकरात लवकर मिळण्यात यावे.
 
- स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी लागणारा निधी मिळावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार