सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईसह देशातील ४० शहरांवर एकाचवेळी ड्रोन हल्ला करण्याचा ISIS चा भयंकर कट NIA च्या अधिका-यांनी लावला उधळून

मुंबई - पुण्यासह ४० शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISIS च्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश...

Shruti Patil
  • Dec 11 2023 8:56AM

मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आला आहे.  केवळ मुंबईच नाही, तर देशातील ४० प्रमुख शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र आयसीसनं (ISIS) आखलं होतं. मात्र एनआयएनं हा कट उधळून लावला आहे. ठाणे भिवंडी पडघा, भाईंदर, पुणे आणि कर्नाटकमध्ये एकाचवेळी तब्बल ४४ ठिकाणी NIAनं छापेमारी केली.

या छापेमारीदरम्यान ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली भागातून १५ संशयितांना अटक करण्यात आली आहे. पडघ्यात राहणारा साकीब नाचन हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ पिस्तूल, २ एअर गन, ८ तलवारी, २ लॅपटॉप, ६ हार्ड डिस्क, ३८ मोबाईल फोन, १० पुस्तकं जप्त करण्यात आली. त्याशिवाय रोख रक्कम आणि हमास या दहशतवादी संघटनेचे ५१ झेंडे जप्त करण्यात आले.

हे सर्वजण मुंबईवर ड्रोन हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या सगळ्या दहशतवाद्यांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागामध्ये एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. तिथल्या काही लोकांची कसून चौकशी करण्यात आली. हे संशयित दहशतवाद्यांना विदेशातून फंडिंगही मिळत होती, अशी सूत्रांची माहिती आहे.

एनआयए त्याबाबत अधिक कसून तपास करते आहे. पुण्यातून ज्या संशयितांना एनआयएनं अटक केली, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सापडले. त्यांच्याकडे झाकिर नाईकच्या भाषणांचे व्हिडिओ सापडले. या व्हिडिओंच्या माध्यमातून इसिस भरती केली जात असावी, असा संशय आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार