सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाबीजच्या बियाणे यांचा लातूरमध्ये तुटवडा

लातूर जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाच्या दरात मोठी वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजचे दर मात्र कायम आहेत. बाजारात सध्या सोयाबीनच्या बियांण्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र सध्या मार्केटमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

s.ranjankar
  • Jun 3 2021 7:11PM
महाबीजच्या बियाणे यांचा लातूरमध्ये तुटवडा.

लातूर जिल्ह्यात  दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे  मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
यंदा खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणाच्या दरात मोठी वाढ झालीय. त्या तुलनेत महाबीजचे दर मात्र कायम आहेत. बाजारात सध्या सोयाबीनच्या बियांण्यांना प्रचंड मागणी आहे. मात्र सध्या मार्केटमध्ये महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खाजगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर कमी करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.लातूर जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात सोयाबीनचे  मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी जिल्ह्यामध्ये जवळपास अडीच ते तीन लाख हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात येते. प्रति क्विंटल यंदा बाजारात सोयाबीनला सात ते साडेसात हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांचा ओढा सोयाबीनचे उत्पादन घेण्याकडे अधिक आहे. सध्या शेतकरी बाजारात सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बाजारात यंदा खाजगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांच्या दारात वाढ  झाली आहे.  त्या तुलनेत महाबीजच्या बियाणांचे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकरी महाबीज बियाणे खरेदीस प्राधान्य देत आहेत.मात्र  बाजारात महाबीज बियांनांचा स्टॉक शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करावे लागत आहेत. शासनेने खाजगी कंपनांच्या बियाणांचे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. महाबीजच्या बियाण्यांचा दर हा २,२५० आहे. तर खाजगी कंपनीच्या बियाण्याचा दर हा ३,००० च्या पुढे आहे.  महाबीजकडून दरवर्षी जिल्ह्यात २५ ते २७ हजार क्विंटल बियांने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात यंदा जवळपास २० हजार क्विंटल बियाणे आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यंदा खाजगी कंपन्यांचे बियाणांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा महाबीजच्या बियाणांकडे अधिक असल्याची माहितीत महाबीजच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
दरम्यान, महाबिजच्या बियाणांचा स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे महाबीज बियाणांच्या विक्रेत्यांना दुकानासमोर स्टॉक शिल्लक नसल्याचा बोर्ड लावावा लागत आहे. शेतकरी सतत या बियाणांची दुकानात येऊन मागणी करत आहेत. जिल्ह्याभरात ४८ अधिकृत दुकानातून महाबीज बियाणे विकली जात आहेत . मात्र माल आला की तात्काळ त्याची विक्री होत असल्याने आता दुकानासमोर स्टॉक नसल्याच्या पाट्या लागल्या आहेत. सोयाबीनला यावर्षी विक्रमी दर मिळाला असल्याने शेतकऱ्याचा ओढा सोयाबीनच्या लागवडी कडे आहे . करोना काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. सोयाबीनच्या बियाण्याच्या दरात सरकारने हस्तक्षेप करून दर नियंत्रणात आणले तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार