सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रामदेवबाबा अभियांत्रिकी आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या सीआयआयआयटी अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन*

श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या सेंटर ऑफ  इन्वेंशन, इनोवेशन, इंक्युबॅशन आणि ट्रेनिंग- सीआयआयआयटी या अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नुकतेच केले.

Snehal Joshi .
  • Aug 17 2020 11:49PM
श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेल्या सेंटर ऑफ  इन्वेंशन, इनोवेशन, इंक्युबॅशन आणि ट्रेनिंग- सीआयआयआयटी या अत्याधुनिक केंद्राचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म लघु तसेच मध्यम उद्योग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नुकतेच केले. इनोवेशन ,तंत्रज्ञान आणि संशोधन हाच आत्मनिर्भर भारताचा महामार्ग आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गडकरी यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात म्हटले. सध्याच्या परिस्थितीत नवनवीन क्षेत्रामध्ये जागतिक संधी उपलब्ध आहेत आणि संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने बघत आहे. आत्मनिर्भर भारताची भूमिका इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि संशोधन याच त्रिसूत्रीवर आधारित  असेल असेही गडकरी म्हणाले.पुढे बोलताना त्यांनी श्रीरामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयासारख्या उच्च शैक्षणिक संस्थानी अशा प्रकारचे अधिकाधिक संयुक्त उपक्रम राबवावे असा आशावाद व्यक्त केला. सीआयआयआयटी आणि अन्य अश्या उपक्रमांना आपले मंत्रालय संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने तसेच नागपूर आणि विदर्भाच्या दृष्टीने उभारलेले हे केंद्र एक नव्या संधीचे दालन खुले करून देईल अशी आशा  गडकरींनी व्यक्त केली. रामदेवबाबा आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या संपूर्ण चमूचे त्यांनी अभिनंदन

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार