सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ कोरोणाच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर

छगन भुजबळ कोरोणाच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर

Sudarshan MH
  • Mar 27 2021 6:30AM
शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडको परिसरातील रानाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरवात करत उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको,शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय या भागात पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते.
 
यावेळी श्री. भुजबळ यांनी बाजारपेठेतील व्यापारी व व्यवसायिकांशी चर्चा केली. यावेळी अनेके परिचीतांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मेन रोड हा शहरातील बाजारपेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे श्री. भुजबळ यांनी अनेक नागरिकांना मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा असे आवाहन केले. काही युवकांना त्यांनी मास्क दिले. व्यापारी वर्गाने त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. यावेळी भुजबळ म्हणाले, विनंती करतो मास्क पाळा व कोरोना टाळा. काळजी घ्या अन्यथा अनिच्छेने लॅाकडाउन करावे लागेल. ते परवडणारे नाही. यापूर्वीचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. त्यामुळे आपणच कोरोनाचा पराभव करायचा आहे.  
 
 
 
पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमनाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा पर्याय शिल्लक असल्याचे सांगत. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार