सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते नेत्र रुग्ण कक्षाचे उद्घाटन

जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

Nandurbar MH
  • Nov 10 2020 11:01AM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबा : जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  आणि नेत्ररुग्ण कक्ष व नेत्रशस्त्रक्रियागृहचे  उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. 

या सर्व सुविधांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सर्व सुविधा उपयुक्त ठरतील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगले उपचार मिळतील असा विश्वास यावेळी पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला.

जिल्हा रुग्णालयात नवे 5 डायलिसीस  यंत्र आणि 2000 लिटर क्षमतेचा आर.ओ. प्लॅन्ट बसविण्यात आला असून त्यास 77.5 लाख रुपये खर्च झाला आहे. डायलिसीस यंत्रामुळे नागरिकांना उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही.
कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून होणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी 1 कोटी 19 लाख रुपये खर्च झाला असून दररोज 125 जम्बो सिलींडर ऑक्सिजन पुरविण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोरोनावरील उपचारासाठी आणि इतरही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार आहे.

रुग्णालयात 20 खाटांचा  नवा नेत्ररुग्ण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच नेत्रशस्त्रक्रीयागृहदेखील तयार करण्यात आले आहे. त्यासाठी दीड कोटी खर्च करण्यात आला आहे. नेत्र रुग्णांवर आधुनिक उपचार  आणि शस्त्रक्रीया करण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्वाहनचे उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्वाहनच्या सुविधेचे उद्घाटनही  पालकमंत्री ॲड.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुविधेचा चांगला उपयोग होणार आहे. उद्वाहनसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 48 लक्ष  निधी खर्च करण्यात आला आहे. हे कॅप्सूल प्रकारचे असून सर्व आधुनिक सोईंनीयुक्त आहे.
000000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार