सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

१३५ किलो वजनाच्या गजुला मिळाला ४० व्यावर्षी रोजगार!*

माणसाचा जन्म होताच तो तिळातिळाने वाढतो. जीवनाच्या खडतर प्रवासात वय आणि वजनही वाढू लागते.

Sudarshan MH
  • Mar 22 2021 5:35PM
*       उमरखेड : *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
 माणसाचा जन्म होताच तो तिळातिळाने वाढतो. जीवनाच्या खडतर प्रवासात वय आणि वजनही वाढू लागते. परंतु त्याला काही मर्यादा असते. या सर्व गोष्टींमध्ये उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील गजानन शिवशंकर काचरडे अपवाद ठरला. गजानन जन्मानंतर वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी दहा, दहा किलोप्रमाणे सतत वजनाने वाढत गेला. १८ वर्षांपर्यंत त्याचे वजन १८० किलोच्या आसपास वाढत गेले. वाढत्या वजनामुळे गजानन लहानपणी जपानी छोट्या सुमोसारखा अगडबंब दिसायला लागला. अशा परिस्थितीत त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. त्याला धड चालणे, फिरणे, झोपणे याशिवाय वाढत्या अंगानुसार वर्षातून दोनदा नवीन कपड्यांचा जोड शिवून घेणे, यासारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
 
  लहान मुलांकडून चिडवणे आणि हिन भावनेची वागणूक मिळत होती. अशाही परिस्थितीत त्याने आपले शिक्षण बीएपर्यंत सुरूच ठेवले. गजूच्या मते स्वतःला आवडते तसेच जगा कारण जीवनामध्ये वन्समोअर कधीच नसतो. त्याचे हे विचार सर्वसाधारण माणसाला सर्व काही सांगून जातात. आपल्या वाढलेल्या वजनामुळे त्याला कोणतेही काम करणे कठीण होऊन बसले होते. कुठे नोकरीही मिळण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत उमरखेड येथील सिद्धेश्वर युवक मंडळ व दहीहंडी उत्सव समितीतर्फे जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती राम देवसरकर यांच्या पुढाकारातून गजाननला केवळ रोजगार निर्माण व्हावा म्हणून प्रिंटर मशीन देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्याला जीवन जगण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. आज गजाननचे वय ४० असून, वयाच्या २० वर्षांपर्यंत वाढत असलेले वजन मात्र कमी कमी होऊन आज १३५ किलोवर आले. विडूळ येथील एका छोटेखानी कार्यक्रमात केवळ समाजकार्य घडावे, या उद्देशाने, पंचायत समितीचे सदस्य, बालाजी आगलावे, गणेश बेले युवक मंडळ आणि दहीहंडी महोत्सव समितीचे सिद्धेश्वर जगताप, संजय गाडगे, सुधीर पवार, गणेश शिंदे, सुनील चोरघडे, संतोष जिल्हेवार, सूरज मोहकर, विनोद श्रीरामे, अनुप नाईक, बाळासाहेब चंद्रे आणि विडूळ येथील देवसरकर मित्र परिवाराने गजाननला प्रिंटर मशीन बहाल केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार