सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गूणवंत खेळाडू पेन्शन योजना - भारत सरकार योजना.

भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे

Sudarshan MH
  • Mar 18 2021 3:40PM
 
 
पालघर - ( मनीष गुप्ता ) भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे दिनांक 07 जून, 2018 रोजीच्या परिपत्रक/ निर्णयानुसार गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवा निवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना असल्याचे सदरच्या परिपत्रकात नमूद केले आहे. 
ऑलिम्पिंक, कॉमनवेल्थ गेम्स,एशियन गेम्स आणि ऑलिम्पिंक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. तसेच या योजनेबाबतचे निकष सदर परिपत्रकातील 1. 1,1,2,2,3,4,5,6 अन्वये दिले असून याबाबतचा अर्जाचा नमुना दिला आहे.
या योजनेच्या निकष क्र. 6 अन्वये सदर योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्यांने ऑलिम्पिंक, पॅरा ऑलिम्पिंक, पॅरा ऑलिम्पिंक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौम्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/ गुणवंत खेळाडूस खालील तक्त्याम नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेंशन 30 वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवा निवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियर मधून निवृत्त झाले असतील. 
स्पर्धेचे नाव :-
1) ऑलिम्पिंक/ पॅरा ऑलिम्पिंक गेम्स प्राविण्यधारक दरमहा मानधन रक्कम 20,000/-
2) सुवर्ण पदक विश्चचषक/विश्च अजिंक्‍यंपद स्पर्धा (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार ) दरमहा मानधन रक्कम 16,000/-
3) रौप्य व कास्य पदक विश्चचषक स्पर्धा (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार ) दरमहा मानधन रक्कम 14,000/-
4) सुवर्ण पदक - कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स दरमहा मानधन रक्कम 14,000/-
5) रौम्य व कास्य पदक - कॉमन वेल्थ गेम्स, एशियन गेम्स,पॅरा एशियन गेम्स. दरमहा मानधन रक्कम 12,000/-
 
टिप - दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्चचषक/ विश्व अजिंक्यंपद स्पर्धा करिता सदरची योजना लागू राहील. 
या बाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उप सचिव/आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचे स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माती खालील लिंकवर उपलब्ध आहे. 
https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार