सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खेड (राजगुरुनगर) नगर परिषदेचा कचरा..... होय राजगुरुनगर हद्दीत प्रवेश करताय सावधान कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून वाट काढत वराहाच्या दर्शना शिवाय येथे येण्यास सक्त मनाई आहे

पुणे जिल्हातील खेड (राजगुरुनगर)शहारात ग्रामपंचायत

Sudarshan MH
  • Mar 11 2021 8:12PM
 
प्रतिनिधि:-खेड (राजगुरुनगर)
 
पुणे जिल्हातील खेड (राजगुरुनगर)शहारात ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि तिच्या जागी,नगर परिषद "आली.आता टॅक्स वाढणार त्याप्रमाणे सोयीसुविधाही वाढतील, गावाचे शहर होईल, मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील, मॉल्स येतील, सगळीकडे चकचकीत रस्ते होतील, २४ तास पाणी राहील आणि भविष्यातील पिंपरी चिंचवड शहराला खुजा वाटावा असा विकास राजगुरुनगरात होईल. अशी आश्वासने देत नगरसेवक नगरपरिषदेवर निवडुन देखील आले.गल्लीबोळात पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या रंगीबेरंगी पाट्या देखील झळकल्या. दुचाकीला आणि चार चाकीला नगरसेवक असे सोनेरी रंगाचे फलक देखील लागले. राजकीय आश्वासनांमध्ये दिलेला विकास मात्र हरवला तो जर शोधायचा असेल राजगुरुनगर शहरात पुणे नाशिक हायवे कडून पोलीस स्टेशन मार्गे प्रवेश केला की तो हरवलेला विकास कदाचित राजगुरुनगर वासियांना वराहाच्या दर्शन रूपाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला तर नवलच !!!
 
 
ग्रामपंचायतीतून नगरपरिषदेत रूपांतरित झालेल्या या गावाचे शहरात रुपांतरण कधी झाले ते गावाला देखील कळाले नाही. परंतु गाव आणि शहर यांच्यातील बदल होण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायोजना, इन्फ्रास्ट्रक्चर, प्राथमिक गरजा वीज, रस्ता, पाणी आणि कचरा या समस्या जिथल्या तिथेच राहिल्याचे वास्तव जीव घेणे आहे.
 
 
गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणणारे विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावत असताना महाराष्ट्राने पाहिले परंतु राजगुरुनगर नगर परिषदेने विरोधी पक्ष कधी पाहिला नाही आणि अनुभवला नाही तेरी भी चूप मेरी भी चुप या वास्तविक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम खाली गेल्या पाच वर्षाची नौका तिराला लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वच लोकप्रतिनिधिंनी केला.
 
परंतु आता पुन्हा राजगुरुनगर म्हदे निवडणुकांचे बिगुल वाजायला लागले आहे. मागील पाच वर्षात झालेल्या कामांचा हिशोब घेण्यासाठी मतदार राजा उमेदवारांच्या आगमनाची वाट पाहतोय. उमेदवार मात्र मागील पाच वर्षातील समस्याच पुन्हा सोडवणार हाच अजेंडा घेऊन जनतेसमोर जातील की विकासकामांचा बागुलबुवा उभा करतील हे आता पुढील निवडणुकीच्या काळातच कळेलच. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने शहराला भेडसावणारे प्रश्न तमाम जनतेसमोर आणून ठेवणे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आमचे कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत. कचऱ्याचा प्रश्न हा मोठमोठ्या अनेक शहरांत आहे. आपले शहर सध्या कुठे उभे राहते आहे. आत्ताच जर त्यावर प्रभावी उपाय योजना झाल्या तर भविष्यातील शहरीकरणात ही समस्या डोकावणार नाही. खेड पोलीस स्टेशन च्या पाठीमागे डौलात उभा असलेला राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचऱ्याचा डोंगर या कायद्याच्या रक्षकांना तर घाबरवत असतोच मात्र हा कचरा रस्त्यावर आल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना वराह रूपी विष्णूचे दर्शन घेतल्याशिवाय या शहरात येण्यास सक्त मनाई आहे असे देखील निक्षून सांगत असतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार