सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त Diccai आणि अवनी संस्था तर्फे दिव्यांग प्रतिभा संमेलन

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त

Sudarshan MH
  • Dec 4 2020 6:57PM
आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत आणि जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिभा सन्मान समारंभ पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे पार पडला.भावेश भाटिया यांना दिव्य रत्न पुरस्कार,यजुर्वेन्द्र महाजन यांचा दिव्य सेवारत्न पुरस्काराने तर प्रकाश मोहारे यांचा दिव्य क्रीडारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे होते.कॉसमॉस बँकेचे चेअरमन सी.ए.मिलिंद काळे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. माधव जगताप, बडवे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या संचालिका सुप्रियाताई बडवे,पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रकाश भोईटे, SGM ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे संचालक श्री. रमेश पाटील, डी.सी.पी वैशाली माने,ज्येष्ठ वकील राजा सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित.डीकाईचे संस्थापक अध्यक्ष श्री.रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले की, "दिव्यांग, वृद्ध, गोर-गरीब, शेतकरी, आदिवासी यांना सक्षम रोजगार उपलब्ध करून देणे आमचा मुख्य उद्देश आहे.लोकसेवा, मानवसेवा, देशसेवा हीच खरी ईश्वरसेवा".कार्यक्रमामध्ये दिव्यम्स सर्विस लाउनज व फूड इन्शुरन्स, फूड क्लेम,अन्न सुरक्षा बिमा या संकल्पनांचा देखील शुभारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एकबोटे म्हणाले की "दिव्यांगांच्या कल्याणासाठी जे कार्य येमुल गुरुजी करत आहे ते खरेच कौतुकास्पद आहे.SGM ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे मोलाचे योगदान लाभले.सी.ए. ललित पोफळे, दानेश शाह, प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे, राजुशेठ ओसवाल,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डीकाईच्या संचालिका निलिमा येमुल यांनी सर्वांचे स्वागत केले तर कार्यकारी संचालिका राजश्रीताई गागरे यांनी डीकाईच्या मागील उपक्रम व कार्याचा अवहाल सादर केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीकाईचे प्रवक्ते कुणाल वाघ यांनी केले तर आभार प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे यांनी मानले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार