सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संभाजीनगर मतदान केंद्रांवर कोरोना रूग्ण पाहून उडाला थरकाप कोरोना रूग्णाने पीपीई कीट घालून बजावला मतदानाचा हक्क

संभाजीनगर मतदान केंद्रांवर कोरोना रूग्ण पाहून उडाला थरकाप

Sudarshan MH
  • Dec 1 2020 7:25PM

संभाजीनगर: पदवीधर निवडणूकीच्या मतदानासाठी शहरातील एका मतदान केंद्रांवर पदवीधर मतदार असलेला एक कोरोना रूग्ण पीपीई कीट घालून मतदान करण्यासाठी आलेला पाहून सर्वांचीच धावपळ उडाली. एका रूग्णवाहिकेतून हा रूग्ण मतदान केंद्रावर दाखल झाला. त्याला पाहून नागरिकांसह अधिकार्‍यांनाही थरकाप सुटला. मात्र सर्व उपाययोजनांसह या रूग्णास येथे आणले आहे. त्यामुळे कुणीही घाबरू नका, असे त्याच्यासोबत आलेल्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

मराठवाडा पदवीधर निवडणूकीसाठी औरंगाबाद शहरातील सिडको एन-5 येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील मतदान केंद्रांवर मंगळवारी दि.1 एका कोरोना रूग्णानेही मतदानाचा हक्क बजावला. मात्र त्याला पाहून सर्वच घाबरले होते. मतदान केंद्रावर हा कोरोना रूग्ण रूग्णवाहिकेतून आणण्यात आला. पीपीई कीट घालून सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करून त्याला येथे आणले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयात हा रूग्ण उपचार घेत आहे. दरम्यान, आज पदवीधर निवडणुकीचे मतदान असल्याने त्याने जिल्हा सामान्य रूग्णालय (मिनी घाटी) प्रशासनाकडे मतदान करण्याची इच्छा व्यक्‍त केली. सुरूवातीला त्याला समजवण्यात आले. मात्र तरीही या रूग्णाने मतदान करायचेच, असे सांगितले. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने त्यास सर्व उपाययोजना करत, पीपीई कीट घालून रूग्णवाहिकेतून धर्मवीर संभाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर आणले. त्याला पाहून सुरूवातीला येथे कर्तव्यावर असलेल्या सर्वच अधिकार्‍यांना थरकाम सुटला. नागरिकांचीही धावपळ उडाली. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी रांग सोडली. मात्र, त्याच्यासोबत आलेल्या डॉक्टरांनी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या असल्याची खात्री दिली. त्यानंतर या रूग्णाने मतदान केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना रूग्ण मतदारांसाठी वेगळे नियोजन नाही : मराठवाडा पदवीधर निवडणूकीत प्रशासनाने कोरोना रूग्णांना मतदानासाठी वेगळी व्यवस्था केलेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. नियमानुसार मतदान करण्याचा प्रत्येकाला संविधानाने हक्क दिलेला आहे. त्यापासून कुणालाही वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे कोरोना रूग्ण असलेल्या पदवीधर मतदारांसाठी प्रशासनाने वेगळी व्यवस्था करायला हवी होती, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.

मिनी घाटीतील चार रूग्णांना पाठवले : ज्या कोरोना रूग्णांना मतदान करायचे आहे, त्यांना करू द्या अशा शासनाच्या सूचना होत्या. चार ते पाच वाजेदरम्यान या रूग्णांना त्यांच्या मतदान केंद्रांवर रूग्णवाहिकेतून पाठवावे, असे आदेश होते. त्यानुसार मिनी घाटीतून चार कोरोना रूग्णांना शहरात केंद्रांवर मतदानासाठी पाठवण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार