सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*१ मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा*

१८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी के

Sudarshan MH
  • Apr 27 2021 3:49PM


भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

 

     १८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली.

     भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

    उपाध्ये म्हणाले की, लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. १ मे नंतर लसीकरणासाठीमोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतील अशी अपेक्षा आहे.  सध्याचे लसीकरण आणि 1 मेपासून होणारे 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पाहता प्रत्येक महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यानुसार लसीकरण केंद्रांची आकडेवारी जाहीर करावी.एक मेपासून लसीकरणासाठी होणारी अधिकची गर्दी ध्यानात घेऊन राज्य सरकारने जी लसीकरणासाठीची जास्तीची केंद्रे निश्चित केली आहेत, त्यांची यादी जाहीर करावी.

     एक मेनंतर होणाऱ्या लसीकरणासाठी आयत्या वेळी येणाऱ्या नागरिकांना वॉक इनसाठी परवानगी असेल का ? की केवळ आधी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लसीकरण केले जाईल,  याबाबतही  राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण मोफत आहे की सशुल्क आहे याबाबत आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे काही मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसते असल्याने लसीकरण मोफत आहे की नाही याचाही खुलासा राज्य सरकारने करावा, असे उपाध्ये यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार