सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सात हाजार शेत पंपाची कनेक्शन कट केल्याने महावितरण अधिकाऱ्याला खुर्चीला बांधून चप्पल हार घालून भाजप आमदारांनी सरकारचा केला निषेध......

भाजप आमदारांनी सरकारचा केला निषेध......

Sudarshan MH
  • Mar 27 2021 10:47AM
 
प्रतिनिधि:-दिपक चव्हाण
 
चाळीसगाव तालुक्यामध्ये सध्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारपिटी झल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठ नुकसान झाले आसुन शेतकरी पुन्हा एकदख मोठ्या संकटात सापडला आहे परतु राज्य सरकार कडुन त्याना आजुन कुठल्याही प्रकार ची मददन जाहिर झाली नसुन मात्र मात्र महाविरण विभागा कडुन तालुक्या तील तब्बल ७ हजार शेतीपंप कनेक्शन तोडण्याचे काम महावितरण विभागाकडून करण्यात आले आहे महाविरण विभागा कडुन विज बिला भरण्या साठी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर करून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने मनमानी करून वीज बिले वसूली केली जात आहे शेतकऱ्यां कडून जबरदस्तीने तीन महिन्याचे थकीत वीज बिलांचा भरणा करून सुद्धा त्यांना मागील दहा वर्षाची बिले भरा असे कारण दाखवत त्यांचे वीज कनेक्शन कट करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात आसल्याने आज भाजप आमदार मंगेश चव्हाण व तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरण विभागाचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून चक्क महाविरण विभागाचे अधिक्षक अभियंता शेख यांना दोरीने बांधून चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करत महाविकास आघाडी सरकार ला मोठा इशारा देण्यात आला आहे।
 
यावेळी भाजप आमदा मंगेश चव्हाण म्हणाले कि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी आमदार मिरविण्यासाठी झालो नाही तर सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आमदार झालो आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी मी राज्यातील महा विकास आघाडी सरकारचा व ऊर्जा मंत्री आणि त्यांच्या महावितरण विभागाच्या िगरगट्ट अधिकार्‍यांचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही महा विकास आघाडी सरकारने व ऊर्जा मंत्री यांनी ह्या निगरगट्ट अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबवावा अन्यथा याचे दुष्परिणाम राज्यातील तिन तिघाडा काम बिघाडा आसलेल्या महाविकास आघाडी सरकारला व महावितरण विभागाला भोगावे लागतील अशी संतापजनक प्रतिक्रिया भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आसुन
 
ते म्हणाले की शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी मी अनेकदा अधिक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या मात्र त्यांची दखल घेतली नाही. चालू तीन महिन्यांचे बिल भरण्याचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या, जेव्हा शेतकरी बिल भरायला गेले तेव्हा मात्र मागील १० वर्षाची थकबाकी भरा म्हणून अधिकारी सांगतात।मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न नाही त्यात यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले. आम्ही गेल्या चार दिवसान पासुन संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत आहे. त्यात वीज कनेक्शन कट केल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, दुधदुभती जनावरांना प्यायला पाणी नाही अशी सर्व विदारक परिस्थिती असताना मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शांत राहणे शक्य नव्हते. मी आमदार मिरविण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो आहे. विविध संकटांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी आज वीज वितरण कंपनीचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून जळगावचे अधिक्षक अभियंता यांना चपलांचा हार घालून त्यांना दोरीने बांधले. शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तात्काळ जोडावी अशी आमची मागणी आहे अन्यथा मला लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागेल असा इशारा यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी महावितरण विभाग व राज्य सरकार दिला असून मात्र महाविकास आघाडी आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे मात्र सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार