सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राममंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात तांबे दान करा---चंपत राय

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने देशभरातील िंहदूंना केले आहे. किमान एक हजार वर्षे उभे राहील इतपत मजबूत राममंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

Snehal Joshi .
  • Aug 20 2020 8:32PM
अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात तांबे दान करा, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने देशभरातील िंहदूंना केले आहे. किमान एक हजार वर्षे उभे राहील इतपत मजबूत राममंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. वारा, सूर्यप्रकाश आणि पाण्याचा किमान हजार वर्षे परिणाम होणार नाही, अशा प्रकारच्या शिळा राममंदिर उभारणीसाठी वापरल्या जात आहेत. मंदिराची उभारणी करणार्या लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीकडे सर्वोत्कृष्ट कामगार आहेत. जमिनीच्या क्षमतेचे परीक्षण करण्यासाठी आयआयटी चेन्नईला सांगण्यात आले. हे मंदिर भूंकपविरोधी व्हावे, हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय इमारत संशोधन संस्थेला सांगण्यात आले, अशी माहिती त्यांनी आज बुधवारी पत्रकारांसोबत चर्चा करताना दिली.  तांब्याचा वापर केल्याने राममंदिर अधिक मजबूत होईल. राममंदिराची उभारणी करण्यासाठी सुरुवातीला 10 हजार तांब्याच्या पट्ट्या आणि सळयांची गरज आहे. तांब्याची पट्टी 18 इंच लांब, 3 मिमी जाड आणि 30 मिमी रुंद असावी. मंदिर बांधण्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाचा हा स्पष्ट पुरावा असेल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.  राममंदिराचे बांधकाम करण्यासाठी फक्त शिळांचा वापर केला जाईल. यात कुठेही लोखंड वापरले जाणार नाही. बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान 36 ते 40 महिने लागतील. मंदिराचे रेखांकन आणि कोरीव काम अद्याप केले जात आहे. या मंदिराची जसजशी उभारणी होईल, त्याची माहिती छायाचित्रांच्या माध्यमातून रामभक्तांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार