सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संभाजीनगर मधील बलात्कार घटनेतील आरोपी मेहबूब शेख या नराधमाची न्याय द्यावा : अभाविप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले

Sudarshan MH
  • Dec 30 2020 6:52PM
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या वतीने संभाजीनगर पोलीस आयुक्तांना आज निवेदन देण्यात आले. संभाजीनगर मधील झालेली बलात्काराची घटना ही अतिशय घृणास्पद अशी घटना आहे.एका २९ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून शिरूर कासार येथील मेहबूब शेख या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आणि तिला जिवे मारण्याची धमकीही दिली असा सिडको पोलीस स्टेशन मध्ये २८ डिसेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.यामध्ये संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचे नाव या घटनेत आले आहे. बलात्कारचा गुन्हा दाखल होऊन ३दिवस झाले परंतु अद्यापही मेहबूब शेख या नराधमाची चौकशी करून त्यास अटक झालेली नाही. तरी पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता निःपक्षपाती पणे या घटनेची लवकरात लवकर सखोल चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ची मागणी आहे. 
         यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, महानगरमंत्री निकेतन कोठारी सहमंत्री ऋषिकेश केकान, सहमंत्री भक्ती जोशी,जिल्हासंयोजक श्यामसुंदर सोडगीर ,सहसंयोजक नागेश गलांडे ,सहसंयोजक अंबादास मेव्हणकर,गोविंद देशपांडे ,धनंजय शेरकर,ऐश्वर्या श्रीश्रीमाळ सह विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार