सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीकडे देशाचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे.

Sudarshan MH
  • Jun 22 2021 5:05PM


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. राष्ट्रमंचच्या बॅनरखाली शरद पवारांच्या दिल्लीतील घरी दुपारी चारच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक राष्ट्रमंचची आहे, तिसऱ्या आघाडीची नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पवारांच्या घरी राष्ट्रमंचची बैठक असली तरीही या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला दिग्गज नेते उपस्थिर आहेत.

या बैठकीत राष्ट्रमंचचे नेते यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांच्यासह 15 पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या संसदीय बोर्डाची बैठक होत आहे. या बैठकीला केरळमधील राष्ट्रवादीचे नेते पी. सी. चाको, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वंदना चव्हाण आणि राष्ट्रवादीचे इतर नेतेही उपस्थित आहेत.

बैठकीला कोण उपस्थित

राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील नामवंतांना या बैठकीत पाचारण करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, केसी सिंह, गीतकार जावेद अख्तर, प्रीतीश नंदी, ज्येष्ठ वकील कोलिन गोन्साल्वीज, करण थापर आणि आशुतोष या बैठकीत सामिल होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार