सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अजित दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज - प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे

पुढचे पक्षाचे अधिवेशन म्हणाल त्या ठिकाणी घेऊ मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष द्या. - सुनील तटकरे.

Shruti Patil
  • Dec 1 2023 7:44PM

कर्जत(रायगड): लोकसभेत एनडीएला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर आपल्याला सर्वोच्च स्थानावर दादांना पहायचे असून दादांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करायला राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाला आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी कर्जतच्या वैचारिक मंथन शिबीरात केले. 

उद्याच्या भवितव्याची अपेक्षा आम्ही ठेवत असू तर तुम्हीही त्याला सहकार्य केले पाहिजे. युवक, युवती आणि महिलांना राजकारणात सक्रिय करायचे आहे. ज्या महिलांसाठी सावित्रीबाई फुले यांनी लढा दिला त्या महिलांसाठी भविष्यात जास्त जागांवर संधी मिळू शकते असेही सुनिल तटकरे म्हणाले. 
 
सत्ता नसताना काय होते हे अनुभवले आणि गेल्या पाच महिन्यात सत्ता आल्यावर काय बदल होत आहे आपण बघत आहोत आता पुढचा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने आपल्याला वाटचाल करायची आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. 
 
पुढचे पक्षाचे अधिवेशन म्हणाल त्या ठिकाणी घेऊ मात्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष द्या. आजच्या शिबीरातून ऊर्जा घेऊन कामाला लागुया असेही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार