सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहयोग सोशल ग्रुप तर्फे व्यसनमुक्ती अभियान व आरोग्य तपासणी

शहरातील जुन्या नगर पालिकेच्या आवारात आरोग्य शिबीर घेऊन त्यात नगरपालिकेतील महिला व पुरुष अशा 70 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Nandurbar MH
  • Nov 25 2021 6:01PM

तळोदा प्रतिनिधी
  शहरातील जुन्या नगर पालिकेच्या आवारात आरोग्य शिबीर घेऊन त्यात नगरपालिकेतील महिला व पुरुष अशा 70 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मुख्याधिकारी सपना वसावा, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र माळी, शहर समन्वयक आकाश हसे, आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, मुकादम सुरेंद्र वळवी, अजय गोजरे, यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सहयोग ग्रुपचे अध्यक्ष ऍड अल्पेश जैन यांनी उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्ती मुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनांपासून लांब राहिल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहील व त्यांनी शरीर सुदृढ ठेवले तर ते तळोदा शहराच्या सुदृढतेसाठी प्रयत्न करतील असे सांगितले. यावेळी नगरपालिकेच्या 70 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. कोणालाही दीर्घ स्वरूपाचे आजार नसल्याचे आरोग्य तपासणीतून समोर आले. शिबिरासाठी सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन, उपाध्यक्ष डॉ.संदीप जैन, डॉ. सुनील लोखंडे, डॉ. योगेश बडगुजर, डॉ. महेश मोरे, डॉ निकिता जैन, रवींद्र चव्हाण, गुड्डू जिरे, सोहेल मंसूरी, राहुल पाटील आदींसह सहयोग सोशल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार