सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Snehal Joshi .
  • Jul 23 2020 3:05PM
बारावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल गेल्या आठवड्यात लागला. दहावीचा निकाल मात्र अजून लागलेला नाही. दहावीच्या निकालाची आता विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता आहे. यावर्षी दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च या काळात आयोजित करण्यात आली होती. दहावीचा शेवटचा भुगोलाचा पेपर होता. पण कोरोनाच्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे हा पेपर रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हिंगोलीमध्ये बोलताना 31 जुलैपूर्वी दहावीचा निकाल लागेल, असं सांगितलं होतं. परंतु, अद्याप महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. देशात 24 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळांमध्ये संकलन हे एक मोठं आव्हान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळापुढे होतं. त्यातच दहावीचा भुगोलाचा पेपर न झाल्यामुळे विषयांचं गुणदान कसं करायचं, हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. अखेर त्याचाही निर्णय झाला.राज्यातील एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, तर 4979 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मागच्या वर्षी 8 जूनला दहावीचा निकाल लागला होता. यावर्षी हा निकाल कधी लागतो याची सर्वांना उत्सुकता आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार