सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुरमुरा गल्लीतील गोळीबार प्रकरण;परस्पर विरोधी गुन्ह्यात 5 जणांना कोठडी

गोळीबार प्रकरण;परस्पर विरोधी गुन्ह्यात 5 जणांना कोठडी

Sudarshan MH
  • Jan 31 2021 10:37AM
मुरमुरा गल्लीतील गोळीबार प्रकरण;परस्पर विरोधी गुन्ह्यात 5 जणांना कोठडी 
 
नांदेड दि.३१(अरविंद जाधव) जानेवारीच्या मध्यरात्री शहरातील मुरमुरा गल्ली भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी दाखल झालेल्या दोन परस्पर विरोधी गुन्ह्यामधील पाच आरोपींना मुख्य न्यायदंडाधिकारी सतीश हिवाळे यांनी 3 फेब्रुवारी 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
29 जानेवारीच्या मध्यरात्री शहरातील मुरमुरा गल्ली भागात गोळीबार झाला. या प्रकरणी व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमध्ये गोळीबार केल्याचे आवाज स्पष्टपणे ऐकायला येतात. या प्रकरणी तिरथसिंघ बसंतसिंघ कडेवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुरमुरा गल्लीत राहणारे टहेलसिंघ लक्ष्मणसिंघ शाहू, त्यांचा मुलगा सतवंतसिंघ आणि दुसरा अल्पवयीन मुलगा यांनी एकत्रितपणे त्यांच्यावर हल्ला करुन गोळीबार केला त्यात जिवे मारण्याचा उद्देश होता. या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी गुन्हा क्र.28/2021 दाखल केला.
याच घटनेसंदर्भाने टहेलसिंघ लक्ष्मणसिंघ शाहू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर तलवारीच्या साह्याने तिरथसिंघ बसंतसिंघ कडेवाले, दर्शनसिंघ बसंतसिंघ कडेवाले आणि मनप्रितसिंघ दयालसिंघ कडेवाले या तिघांनी जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा क्र.29/2021 दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
काल 30 जानेवारी रोजी दुपारी अल्पवयीन बालक वगळता पकडलेल्या पाच जणांना सहायक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे, पोलीस कर्मचारी संजय जाधव, व्यंकट गंगुलवार, संतोष मेलरोड, दत्ता जाधव, बबन बेडदे,बालाजी लामतुरे, प्रदिप कांबळे यांनी न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ऍड.सुनंदा चावरे यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीश सतीश हिवाळे यांनी या पाच जणांना 3 फेब्रुवारी 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार