सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तालुक्यातील रणाईचे भागातील रखडलेले प्रकल्प प्राधान्याने सोडवणार आमदार पाटील.

*अमळनेर* : तालुक्यातील रणाईचे येथील 07 किमी / 12 किमी या दरम्यान हे रुंदीकरण करणे या कामासाठी 85 लाख रुपये व आमदार स्थानिक विकास अंतर्गत महानुभव मंदिर सभामंडप बांधकाम करणे 9 लाख अशा दोन्ही विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प पु आचार्य बिडकर बाबा यांच्या हस्ते अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Sudarshan MH
  • May 29 2021 2:16PM
*रणाईचे येथे 3054 या लेखाशिर्ष अंतर्गत वावडे जवखेडा अंचलवाडी जानवे रस्त्याचे रुंदीकरण भूमिपूजन कार्यक्रमात ग्वाही.* 


 *अमळनेर* : तालुक्यातील रणाईचे येथील 07 किमी / 12 किमी या दरम्यान हे रुंदीकरण करणे या कामासाठी 85 लाख रुपये व आमदार स्थानिक विकास अंतर्गत महानुभव मंदिर सभामंडप बांधकाम करणे 9 लाख अशा दोन्ही विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प पु आचार्य बिडकर बाबा यांच्या हस्ते अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी बाजार समितीचे प्रशासक सदस्य एल टी पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन, जानवे येथील माजी सरपंच रावसाहेब पाटील, दादाभाऊ पाटील, जे व्ही पाटील, रणाईचे सरपंच मीराबाई भिल, अंचलवाडी सरपंच भगवान पाटील, रणाईचे उपसरपंच भावेश पाटील, शिवाजी पाटील, राजू पाटील, सागर देवरे, दिलीप पाटील, युवराज भिल, युवराज पाटील, अशोक पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब पाटील शाखा अभियंता भागवत माळी, ठेकेदार जयवंत चव्हाण, ठेकेदार जहुर पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील व आभार हेमंत पाटील यांनी मानले.

पश्चिम भागातील प्रकल्पांवर चर्चा

यावेळी ग्रामस्थांशी या भागातील मागणी असलेल्या प्रकल्पांवर चर्चा करतांना आमदार अनिल पाटील यांनी गावकऱ्यांचे समज गैरसमज यावर बोलतांना पांझरा माळण नदीजोड प्रकल्पासाठी अक्कलपाडा धरणावर पाण्याचे आरक्षण करणे, मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणे हे काम सुरू असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक बाबींना ब्रेक लागला आहे. याशिवाय यावर चार साठवण बंधारे भरणार आहेत. त्यामुळे आधीपासूनच पश्चिमेकडील उपेक्षित भाग सुजलाम सुफलाम व बारमाही पाणी व्यवस्था करणे हे ध्येय आमदार पाटील यांनी ठेवलेच आहे. व प्रयत्न सुरू आहेत मात्र कोरोनाचा धोका वाढल्याने निधीसह अनेक बाबींना याबाबत
फटका बसला आहे आगामी काळात हा भागतील प्राधान्याने प्रश्न सोडवले जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी गावकर्यांना दिली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार