सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत आहे. त्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्सास हरकत घेतली आहे

Aishwarya Dubey
  • Sep 15 2020 3:41PM

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत हळूहळू उद्योग धंदे आणि सार्वजनिक ठिकाणे खुली करण्यात आली आहे. परंतु, शाळा कधी सुरू होणार याबद्दल अनिश्चितता कायम आहे. अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी  सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून ज्या संस्था शाळा सुरू करू शकतात, त्यांनी सुरू कराव्यात असं म्हटले आहे.  पण राज्यातील शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्थाचालक तसंच शिक्षण तज्ज्ञांसोबत चर्चा केली. यात बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत आहे. त्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्सास हरकत घेतली आहे. याबद्दल आता राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.

 

तुर्तास इयत्ता 10 आणि 9 वी तुकड्यां सुरू करण्याचा विचार नाही, अशी माहिती  वर्षा गायकवाड यांनी दिली. शहरी भागास ग्रामीण भागात कोरोना रूग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मतं आहे, असं ही गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले. असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार