सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उत्तर प्रदेश : ट्रक अपघातात 24 मजूर ठार, 22 जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे

ऐश्वर्या दुबे
  • May 16 2020 9:42AM

एका ट्रकने प्रवासी मजुरांनी भरलेल्या डीसीएमला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात 24 मजूर ठार झाले आहेत. तर 35 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यातील 22 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात कोतवाली परिसरातील मिहौली राष्ट्रीय महामार्गावर झाला. यामध्ये 24 जण जागीच ठार झाले आहेत. तर पंधरापेक्षा अधिक मजूर जखमी झाले आहेत. ट्रकने धडक दिली तेव्हा डीसीएम रस्त्यावर उभा होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

 औरैयाच्या जिल्हाधिकार्‍यानी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी अनेक हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल मधील रहिवासी आहेत.दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले असून जखमींना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी करून नेमका अपघात कशामुळे झाला याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार