सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

या ' हम ' मागे दडलय काय...?

पणजी येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचा फोटो शेअर केला असून फक्त ‘हम’.. एवढा एकच शब्द लिहिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असून काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मात्र संजय राऊत यांच्या या ट्वीटचा अर्थ काय निघेल, काँग्रेसला शिवसेनेचा पाठींबा असेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Snehal Joshi .
  • Feb 11 2022 11:17PM

हाराष्ट्र काँग्रेस आणि गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज पणजी येथे भेट झाली. तब्बल दीड तास चाललेल्या या चर्चेत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, या बाबत आता आडाखे बांधले जात आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला अधिक महत्त्व आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेले ट्वीटदेखील जास्त सांकेतिक आहे. त्याचेही वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. गोव्यात काँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने काँग्रेससमोर युतीचा पर्याय ठेवला होता. मात्र काँग्रेसने तो नाकारला. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी सरकारची शक्यता मावळल्याची चिन्ह होती. त्यानंतर गोवा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे..

 दरम्यान पणजी येथे आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी या भेटीचा फोटो शेअर केला असून फक्त ‘हम’.. एवढा एकच शब्द लिहिला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली असून काँग्रेस स्वबळावर लढत आहे. मात्र संजय राऊत यांच्या या ट्वीटचा अर्थ काय निघेल, काँग्रेसला शिवसेनेचा पाठींबा असेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

मात्र आता काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या नेत्यांच्या भेटीमागील प्रयोजन नेमके काय आहे, यावर चर्चांना उधाण आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार