सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

BREAKING: जेलमध्येच राहणार रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची नावं आहेत

Aishwarya Dubey
  • Sep 11 2020 1:18PM

सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला जेलमध्ये राहावं लागणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने सर्व 6 आरोपींची जामीन याचिका फेटाळली असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे. रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलांत्रा आणि बासित परिहार अशी सर्व 6 आरोपींची नावं आहेत.

याआधीही रियाने जामीनासाठी अर्ज केला होता पम कोर्टाने तिला नाकारलं. आज रियाचा तुरूंगात तिसरा दिवस असणार आहे. रियाने दोन दिवस तुरुंगात काढले आहेत. ज्या दिवशी कोर्टाने निकाल दिला, त्या दिवशी रियाने तिची रात्र एनसीबी लॉकअपमध्ये घालवली. यानंतर, दुसर्‍याच दिवशी रियाला भायखळा तुरुंगात हलवण्यात आलं.

 

दरम्यान, एनसीबीच्या चौकशीदरम्यान तिला तिच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य करण्याचा जबाब देण्यास भाग पाडले गेले. एनसीबीने 3 दिवस रियाची चौकशी केल्यानंतर मंगळवारी तिला अटक करण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाने तिची जामिन याचिका आधीच फेटाळली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार