सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाल्याची माहिती

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 13 2020 11:50AM

पुणे, 13 जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच शहरात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील येरवडा जेलच्या क्वारन्टाइन सेंटरमधून 2 आरोपी पळाल्याची माहिती समोर आली आहे. आकाश पवार आणि अर्शद सय्यद अशी पळून गेलेल्या आरोपींची नावं आहेत.

येरवडा जेल लॉकडाऊन असल्याने शेजारच्या वसतीगृहात आरोपींना ठेवलं जात आहे. मात्र तिथूनच शौचालयाचा बहाना करून आरोपी पळाले. पळून गेलेले दोघेही पुणे जिल्ह्यातीलच असून एकजण 307 तर दुसरा 392च्या गुन्ह्यातील आरोपी आहे. बार्टीच्या मागासवर्गीय वसतीगृहात सध्या बाहेरून येणाऱ्या आरोपींना ठेवलं जात आहे. कारण कोरोनामुळे येरवडा जेल लॉकडाऊन आहे. बाहेरच्या आरोपींना जेलमध्ये सध्या एण्ट्री नाही.

महाराष्ट्रातील 8 कारागृहे लॉकडाऊन

कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातील 8 कारागृहे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. राज्यातील मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह, व कल्याण जिल्हा कारागृह, औरंगाबाद व नाशिक, नागपूर ही कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली आहेत

कारागृहात काम करणार्‍या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडे कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी नंबर देण्यात येतील. जर कुटुंबाला काही अडचण भासली त्यांनी वरिष्ठांकडे संपर्क साधावा. ज्यायोगे त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण होईल, असा निर्णय घेण्यात आला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार